Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
टी-20 मुंबई लीगचे जोशात उद्घाटन

टी-20 मुंबई लीगचे जोशात उद्घाटन

सामना 1 week ago

टी-20 मुंबई लीगच्या 'सीझन लाँच' कार्यक्रमात अजिंक्य, श्रेयस, शार्दुल, सिद्धेश यांनी सर्वांची मनं जिंकली. पुरुष आणि महिलांची ही लीग 1 ते 13 जून या कालावधीत होणार आहे. पुरुष आणि महिलांचे सामने वानखेडे स्टेडियमवर एकाच वेळी आयोजित करण्यात येणार आहेत.

31 लेबल्स द्वारे आयोजित या कार्यक्रमाला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि लीग गव्हार्ंनग कौन्सिलचे अध्यक्ष राजदीप गुप्ता उपस्थित होते.

अजिंक्य नाईक म्हणाले, 'अजिंक्य रहाणे, शार्दूल ठाकूर आणि श्रेयस अय्यर यांसारख्या खेळाडूंनी मुंबईकडून खेळल्यानंतर हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले. आता ते युवा खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करून आपले ज्ञान व अनुभव त्यांना देतील, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.'

'सर्व तरुण क्रिकेटपटूंना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अभिनंदन. ज्या खेळाडूंनी कठोर परिश्रम केले आहेत, त्यांच्यासाठी त्यांची प्रतिभा व्यक्त करण्याची आणि त्यांच्या कारकीर्दीत पुढील पाऊल टाकण्याची ही एक उत्तम संधी आहे,' असे नॉर्थ मुंबई पँथर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana