Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
टीईटी पेपरफुटी प्रकरण - आग्रा प्रिंटिंग प्रेसमधील 3 कर्मचाऱ्यांना अटक

टीईटी पेपरफुटी प्रकरण - आग्रा प्रिंटिंग प्रेसमधील 3 कर्मचाऱ्यांना अटक

सामना 1 week ago

टीईटी पेपर फुटीप्रकरणी ठाणे पोलिसांच्या विशेष पथकाने आग्रा प्रिंटिंग प्रेसमधील तीन कर्मचाऱयांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता दहा झाली आहे. टीईटी परीक्षेच्या पेपरची छपाई आग्रा येथील प्रिंटिंग प्रेसमध्ये झाली होती.

प्रिंटिंग प्रेसमधून पेपर बाहेर काढण्यात या अटक करण्यात आलेल्या तिन्ही कामगारांचा हात असल्याचे तपासात उघड झाले आहे. या तिघांना भिवंडी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना येत्या 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत.

ठाणे पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केलेल्या आरोपींमध्ये संजयकुमार शर्मा, बाबुलाल कुशवाह आणि नरेशकुमार माहौर या तिघांचा समावेश आहे. हे तिघेही आग्रा शहरातील महिम पत्रण प्रायव्हेट लिमिटेड या प्रिंटिंग प्रेसमधील कर्मचारी आहेत. या तिघांचा टीईटी पेपरफुटी प्रकरणात महत्त्वाचा सहभाग असून प्रिंटिंग प्रेसमधून प्रश्नपत्रिका बाहेर काढण्यात या तिघांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पेपरफुटी प्रकरणात या तिघांनी काही आर्थिक व्यवहार केले आहेत का, याचा पोलीस तपास करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana