Dailyhunt
ट्रेंड - बाईकला पेट्रोलने घातली अंघोळ

ट्रेंड - बाईकला पेट्रोलने घातली अंघोळ

सामना 3 weeks ago

सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी एका तरुणाने आपल्या दुचाकीला चक्क पेट्रोलनेच अंघोळ घातली आहे आणि तीही थेट पेट्रोल पंपावर.

हा व्हिडीओ asraf__rider_ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या संतापाचा भडका उडाला. एखादी चूक झाली असती तर मोठी दुर्घटना घडली असती अशी भीती नेटकऱ्यांनी व्यक्त केली. या तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी नेटकऱयांनी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana