Dailyhunt
ट्रेंड - बालपणाचे संस्कार.

ट्रेंड - बालपणाचे संस्कार.

सामना 2 days ago

लिबो झिमो यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओत एका चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या हातून चुकून शाळेतील कचराकुंडी तुटली. याबद्दल त्याने कोणालाही काहीही सांगितलेसुद्धा नाही. पण त्याने शांतपणे कचरापेटी उचलली आणि दुसऱ्या दिवशी तोच मुलगा मोठी गडद हिरव्या रंगाची कचरापेटी घेऊन एका कॉरिडॉरमधून चालताना दिसला.

त्याने ती कचरा पेटी दोन्ही हातांनी काळजीपूर्वक पकडली आणि जागेवर ठेवली. या चिमुकल्याने नकळत चूक झाल्यावर जबाबदारी घेण्याची, चूक मान्य करण्याची आणि ती सुधारण्याची खूप चांगली शिकवण व्हिडीओद्वारे दिली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana