Dailyhunt
ट्रेंड - डोक्यात कोयता अडकलेला तरुण हॉस्पिटलमध्ये चालत आला

ट्रेंड - डोक्यात कोयता अडकलेला तरुण हॉस्पिटलमध्ये चालत आला

सामना 1 week ago

र्वांना थक्क करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. डोक्यात कोयता अडकून गंभीर जखमी झालेला तरुण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी स्वतःच्या पायांवर चालत आला. ना कोणी साथीदार ना कोणी नातेवाईक.

एवढंच नाही तर, तो त्याच अवस्थेत रुग्णालयात इकडे तिकडे फिरत होता तसेच मोबाईलमध्ये बघतानादेखील दिसत होता. त्याला पाहून रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या अन्य रुग्णांच्या अंगावर काटाच उभा राहिला. हा व्हिडीओ मुंबईतील सायन येथील शासकीय रुग्णालयातील असून @thechillingpoint या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्काच बसला. एवढा गंभीर दुखापत होऊनही रुग्णाला उपचार देण्याऐवजी बाहेर उभे ठेवल्याचा संताप यावेळी नेटकऩयांनी व्यक्त केला. हा व्हिडीओ पाहून मुंबईत गुन्हेगारीत वाढ झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana