सोशल मीडियावर थायलंडमधील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्यामध्ये असे दिसतेय की, एक जंगली हत्ती अगदी निवांतपणे एका परिसरातील छोट्या दुकानात शिरला आणि जणू काही तो नेहमीचाच ग्राहक आहे अशा थाटात दुकानातील खाऊ त्याने खाल्ला.

हत्तीने गोड राईस क्रॅकर्स, केळी, पॅकेटमधील स्नॅक्स आणि एक सँडविच निवडून खाल्ले. खाऊन झाल्यावर तो शांतपणे दुकानाबाहेर गेला. लोकांनी त्या हत्तीची ओळख पटवली आहे. प्लाय बियांग लेक असे त्याचे नाव आहे. तो आसपासच्या भागात वारंवार दिसणारा जंगली हत्ती आहे. राष्ट्रीय उद्यानाजवळ राहणारे लोक सांगतात की, तो अधूनमधून खाण्यासाठी मानवी वस्तीत येतो.