केदारनाथ यात्रा करणाऱया दोन वृद्ध महिलांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 70 वर्षांहून अधिक वयाच्या या दोघी बहिणी आहेत. आयुष्याने दिलेल्या प्रत्येक संधीचा स्वीकार करण्याचे जणू काही मनाशी ठरवून त्या केदारनाथ यात्रेला निघाल्या आहेत.
त्यांची ऊर्जा आणि त्यांची इच्छा त्यांच्या वयावर आणि शारीरिक मर्यादांवर मात करत आहे. दोघी ट्रेकिंगप्रेमी आहेत. त्यांना ट्रेकिंगच्या माध्यमातून जगभर फिरण्याचे, नवीन लोकांना भेटण्याचे आणि वेगवेगळ्या संस्कृती अनुभवण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. इन्स्टाग्राम युजर जिनी हिने केदारनाथच्या यात्रा करणाऱया दोन बहिणींचा व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ @girirajkumari_jhala या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

