Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ट्रेंड - पदवीदान समारंभात आगंतुक पाहुणी

ट्रेंड - पदवीदान समारंभात आगंतुक पाहुणी

सामना 3 weeks ago

हाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून पदवी मिळवण्याचा दिवस प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खास असतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी पदवी स्वीकारायला मंचावर मांजरीसोबत आला, ज्याने सर्वांचे लक्ष वेधले.

मांजराला पाहून सर्वजण अचंबित झाले. काही प्राध्यापक मांजराला प्रेमाने कुरवाळतात. विद्यार्थी आपली पदवी स्वीकारतो. संपूर्ण पदवीदान समारंभात मांजर त्या विद्यार्थ्याच्या खांद्यावर आरामात बसून होती. हा व्हिडिओ नवल तांबुलकर यांनी @shutupnaval या इंस्टा पेजवरून शेअर केला होता. व्हिडिओ पाहून नेटिझन्स म्हणतात, ''याला पदवीदान समारंभ म्हणू नका, 'पॅटव्होकेशन' म्हणा.'' एकीने लिहिले की ''ती हा व्हिडिओ तिच्या मांजरीला दाखवेल जेणेकरून तिला कळेल की इतर मांजरेदेखील पदवी घेण्यासाठी महाविद्यालयात जात आहेत.''

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana