देशभरात तापमान वाढले असून नागरिक उकाडय़ाने हैराण आहेत. त्यातच बाईकवर बसून प्रवास करणे म्हणजे एक प्रकारचे आव्हानच. या उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी एका अवलियाने असा जुगाड केला की पाहणारे लोक थक्क झाले.
या तरुणाने लोखंडी रॉडच्या मदतीने बाईकवर छप्पर उभारले. त्यावर छतासाठी त्याने गवताचा पेंडा आणि काडय़ा व इतर साहित्य वापरले आहे. या छप्पर असलेल्या बाईकवर बायकोला बसवून फेरफटका मारतानाचा या तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. हा व्हिडीओ thehabibsaifi या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला असून त्याला 1.2 मिलियन्स लाईक्स मिळाले आहेत.

