Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तृणमूल निकालाला आव्हान देणार,सुप्रीम कोर्टात ममता स्वतः खटला लढणार

तृणमूल निकालाला आव्हान देणार,सुप्रीम कोर्टात ममता स्वतः खटला लढणार

सामना 2 weeks ago

श्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. त्यासाठी वकिलीची प्रॅक्टिस पुन्हा सुरू करून प्रसंगी स्वतः खटला लढण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

तृणमूलचे नवनिर्वाचित आमदार व नेत्यांची बैठक ममतांच्या कालिघाट येथील निवासस्थानी आज झाली. या बैठकीत निवडणुकीच्या निकालावर सविस्तर चर्चा करण्यात आली. भाजप आणि निवडणूक आयोगाने घोटाळे करून ही निवडणूक जिंकली. जवळपास 100 जागा ढापण्यात आल्या.

त्यासाठी अनेक प्रकारचे घोळ घालण्यात आले. मतमोजणी पेंद्रावरील सीसीटीव्ही फुटेजही निवडणूक आयोगाने नाकारले. या सगळय़ा बाबी सर्वोच्च न्यायालयापुढे ठेवण्यात येणार आहेत. निवडणुकीत पराभव झालेल्या माजी आरोग्यमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य आणि मी पुन्हा वकिली सुरू करणार आहोत, असे त्या बैठकीत म्हणाल्याचे सूत्रांकडून समजते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana