Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तुरळ येथे दोन चारचाकींची समोरासमोर धडक; दुचाकीलाही उडवले, सुदैवाने जीवितहानी टळली

तुरळ येथे दोन चारचाकींची समोरासमोर धडक; दुचाकीलाही उडवले, सुदैवाने जीवितहानी टळली

सामना 2 weeks ago

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तुरळ येथे शनिवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, धडकेच्या जोरामुळे एक दुचाकीही अपघातग्रस्त झाली.

मात्र, सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत अथवा जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ही कार चिपळूणकडून संगमेश्वरच्या दिशेने जात होती. त्याचवेळी दुसरी चारचाकी संगमेश्वरकडून कडवईकडे जाण्यासाठी महामार्ग ओलांडत असताना दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की, घटनास्थळी असलेली एक दुचाकीही दोन कारमध्ये सापडली.

स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या अपघातात दोन्ही चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाहनांतील प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून अपघाताबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana