Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
उकडलेले अंडे सोलण्यासाठी ही सोपी ट्रिक वापरून बघा

उकडलेले अंडे सोलण्यासाठी ही सोपी ट्रिक वापरून बघा

सामना 6 hrs ago

कडलेले अंडे खाणे सोपे असले तरी ते व्यवस्थित सोलणे अनेकदा कठीण जाते. अंड्याची साले काढताना अनेकदा त्याचा पांढरा भागही काढला जातो. त्यामुळे संपूर्ण अंड्याचा आकार बिघडतो. उकडलेले अंडे नीट सोलण्यासाठी काही महत्त्वाच्या ट्रिक्स वापरणे गरजेचे आहे.

सर्वप्रथम एका भांड्यात अंडी पूर्णपणे बुडतील इतके पाणी घ्या आणि ते चांगले उकळू द्या. पाणी उकळल्यानंतर मोठ्या चमच्याच्या मदतीने अंडी हळूवारपणे पाण्यात सोडा. अंडी थेट भांड्यात टाकण्याऐवजी चमच्याने सोडल्यास ती फुटण्याचा धोका कमी होतो. अंडी साधारण ८ ते १२ मिनिटे उकळू शकता.

अंडी उकडल्यानंतर त्यांना लगेच बर्फाच्या किंवा अतिशय थंड पाण्यात टाका. अंडी पूर्णपणे पाण्यात बुडतील याची काळजी घ्या. साधारण ३ ते ५ मिनिटे ती थंड पाण्यात राहू द्या. अंडी थंड झाल्यामुळे ती हाताळणे सोपे होते.

यानंतर येते अंडे सोलण्याची खास ट्रिक. एका अंड्याच्या टोकाला चमच्याने अगदी हलकीशी टकटक करून छिलक्याला छोटीशी भेग पाडा. त्यानंतर अंडे पाण्याने भरलेल्या एका साध्या ग्लासमध्ये ठेवा. ग्लासचे तोंड हाताने बंद करून काही सेकंद हलक्या हाताने हलवा. यामुळे छिलक्याला अनेक ठिकाणी तडे जातात आणि पाणी त्या भेगांमध्ये शिरते. त्यामुळे छिलका सफेदीपासून वेगळा होण्यास मदत होते.

यानंतर अंडे ग्लासमधून बाहेर काढून हाताने सोलावे. अनेकदा छिलका मोठ्या तुकड्यांमध्ये सहज निघतो. एखाद्या ठिकाणी छिलका चिकटून राहिल्यास वाहत्या पाण्याखाली हलक्या हाताने तो काढता येतो.

मात्र, ग्लासमध्ये अंडे हलवताना खूप जोर लावू नका. जास्त जोराने हलवल्यास अंड्याची सफेदी तुटू शकते. तसेच चमच्याने भेग पाडतानाही अंड्याला जास्त जोरात मारू नये. अंडे आधी व्यवस्थित थंड केल्यास सोलण्याची प्रक्रिया आणखी सोपी होऊ शकते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana