Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वैभवची फलंदाजी म्हणजे सिनेमा पाहिल्याचा आनंद, वैभवच्या झंझावातावर पुजाराही फिदा

वैभवची फलंदाजी म्हणजे सिनेमा पाहिल्याचा आनंद, वैभवच्या झंझावातावर पुजाराही फिदा

सामना 1 month ago

वैभव सूर्यवंशीची फलंदाजी म्हणजे जणू एखादा थरारक सिनेमा. प्रत्येक चेंडूवर उत्कंठा, प्रत्येक फटक्यावर टाळ्यांचा कडकडाट. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने पुन्हा एकदा हाच 'मनोरंजनाचा तडका' देत पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात 16 चेंडूंत 43 धावांची स्फोटक खेळी साकारली आणि राजस्थान रॉयल्सच्या विजयाची पटकथा पॉवर प्लेमध्येच लिहून काढली.

सूर्यवंशीने सुरुवातीलाच गोलंदाजांवर तुटून पडत मैदानावर अक्षरशः धुमाकूळ घातला. त्याच्या बेधडक फटकेबाजीमुळे पंजाबचे गोलंदाज गोंधळले, क्षेत्ररक्षण विस्कळीत झाले आणि राजस्थानने आक्रमक सूर इतका तीव्र ठेवला की, प्रतिस्पर्ध्यांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. काही षटकांतच सामन्याचा कल पूर्णपणे राजस्थानकडे झुकला.

हिंदुस्थानी संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारादेखील या खेळीने थक्क झाला. 'सूर्यवंशीची फलंदाजी म्हणजे सिनेमा पाहण्यासारखीच. रोमांचक, धडकी भरवणारी आणि सतत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी,' असे पुजारा म्हणाला. तो आक्रमण करणार हे सगळ्यांना माहीत असते तरीही त्याला थांबवणे अवघड जाते, हीच त्याची खरी ताकद असल्याचेही पुजारा म्हणाला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana