Dailyhunt
व्हाईट हाऊस डिनर पार्टीमधील गोळीबाराचे नवीन फुटेज समोर; सुरक्षा चेकपॉईंटवरील थरार CCTV मध्ये कैद, आरोपीने एक दिवस आधी रेकी केल्याचेही उघड

व्हाईट हाऊस डिनर पार्टीमधील गोळीबाराचे नवीन फुटेज समोर; सुरक्षा चेकपॉईंटवरील थरार CCTV मध्ये कैद, आरोपीने एक दिवस आधी रेकी केल्याचेही उघड

सामना 2 weeks ago

मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये सुरू असलेल्या डिनर पार्टीत एक बंदुकधारी घुसला आणि त्याने धडाधड 7 गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्याचा आता आणखी एक व्हिडीओ आता समोर आला असून आरोपी कोल थॉमस अ‍ॅलन याने एक दिवस आधी हॉटेलची रेकी केल्याचेही समोर आले आहे.

गुरुवारी अमेरिकन ॲटर्नी जीनिन पिरो यांनी व्हाईट हाऊस डिनर पार्टीतील गोळीबाराचे अधिकृत सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध केले. यात हल्लेखोर सुरक्षा चेकपॉईंटवर गोळीबार करताना स्पष्ट दिसत आहे. तसेच घटनेच्या एक दिवस आधी म्हणजेच 24 एप्रिल रोजी ॲलन हॉटेलमधील जिम आणि कॉरिडॉरमध्ये फिरून रेकी करत असल्याचे दुसऱ्या एका व्हिडिओतून समोर आले आहे.

25 एप्रिल रोजी वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये एका डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. प्रेसिडेंट ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प, उपाध्यक्ष जे. डी. वान्स, त्यांच्या पत्नी उषा वान्स हेही या पार्टीत प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. रात्री साडेआठच्या सुमारास पार्टी सुरू असताना हल्लेखोर अ‍ॅलन गोळीबार करत बॉलरूमच्या दिशेने गेला. त्याने 7 गोळ्या झाडल्या. यात सिक्रेट सर्व्हिसचा एक अधिकारी जखमी झाला. तर दुसरा अधिकारी बुलेटप्रूफ जॅकेटमुळे वाचला. हल्ला झाल्याचे कळताच ट्रम्प आणि वान्स यांना तत्काळ सुरक्षित स्थळी नेण्यात आले.

यानंतर आरोपी कोल थॉमस अ‍ॅलन याला बेड्या ठोकल्यात आल्या. कॅलिफोर्नियातील टोरन्स येथील रहिवासी असलेल्या ॲलनकडे कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर डिग्री आहे. त्याचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचे त्याच्या वकिलांनी सांगितले. ॲलनने आपल्या कुटुंबाला फ्रेंडली फेडरल असॅसिन असे संबोधून संदेश पाठवला होता. यामध्ये त्याने ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याची योजना आखली होती.

रोनाल्ड ते डोनाल्ड; वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलचा काळा इतिहास, 45 वर्षांपूर्वीच्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या

दरम्यान, ॲलनवर राष्ट्राध्यक्षांच्या हत्येचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्रास्त्रांची वाहतूक आणि हिंसक गुन्ह्यासाठी शस्त्राचा वापर यांसारखे अनेक फेडरल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून 12-गेज पंप-ॲक्शन शॉटगन आणि तीन चाकू जप्त केले आहेत. गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana