Thursday, 14 Oct, 9.15 am सामना

ठळक
व्होलोकॉप्टरच्या व्होलोड्रोनचे पहिले यशस्वी उड्डाण

व्होलोकॉप्टरच्या इलेक्ट्रिक हेवी-लिफ्ट ड्रोन 'व्होलोड्रोन'ने बुधवारी आयटीएस वर्ल्ड काँग्रेस-2021 मध्ये पहिले यशस्वी सार्वजनिक उड्डाण केले. शहरी हवाई गतिशीलतेचे प्रणेते आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक नेते डी बी शेंकर आणि व्होलोकॉप्टरने व्होलोड्रोनचे प्रदर्शन केले.

पोर्ट हॅम्बर्ग येथे 3 मिनिटांच्या चाचणीदरम्यान व्होलोड्रोनने दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी उड्डाण करून 22 मीटरपर्यंतची कमाल उंची गाठली. सुरुवातीला व्होलोड्रोनअंतर्गत बॉक्सवर एक युरो-पॅलेट आकाराचे लोड प्राप्त करण्यात आले. त्यानंतर सहजपणे टेक-ऑफ केले. यानंतर विमानाने डीबी शेंकर कार्गो बाईकवर पेलोड आणले व ते सुरक्षितपणे उतरले. हे पहिले सार्वजनिक व्होलोड्रोन उड्डाण यूएएम उद्योगातील व्होलोकॉप्टरच्या आघाडीच्या स्थानाचे भक्कम संकेत आहे, अशी प्रतिक्रिया व्होलोकॉप्टरचे सीईओ फ्लोरिअन रॉयटर यांनी दिली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top