Tuesday, 17 Sep, 9.06 am सामना

ठळक बातम्या
विक्रमशी संपर्क साधण्यासाठी उरले फक्त पाच दिवस

हिंदुस्थानच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेतील लँडर विक्रमशी संपर्क साधण्यासाठी फक्त पाच दिवस उरले आहेत. सर्वांची नजर आता नासावर लागली आहे.

हिंदुस्थानच्या चांद्रयान-2 मोहिमेकडे अवघ्या जगाचे लक्ष होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथमच यान उतरणार होते. मात्र पृष्ठभागापासून अवघ्या 2 किमी अंतरावर असताना विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याने या मोहिमेला काहीसा धक्का बसला. 7 सप्टेंबर रोजी विक्रम चंद्रावर उतरणार होते. त्याचा शोध घेण्यात येत आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासानेही विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विक्रम लँडरला चंद्रावरील एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील 10 दिवसांसाठी काम करण्यासाठी बनवण्यात आले होते. त्यामुळे इस्रो आणि नासाकडे केवळ पाच दिवस उरले आहेत. 20 किंवा 21 सप्टेंबरला चंद्रावर रात्र होईल आणि विक्रमशी संपर्क साधण्याची आशाही संपुष्टात येईल. काही दिवसांपूर्वी इस्रोने विक्रमची थर्मल इमेज शोधली आहे. इस्रोच्या मदतीला नासा सरसावली आहे. नासाचे ऑर्बिटर मंगळवारी विक्रम उतरला त्या भागावरून जाणार आहे. या भागाचे फोटो नासाचा ऑर्बिटर काढण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा आशा पल्लवित झाली आहे.

विक्रमच्या लँडिंग साईटवरून नासाचे ऑर्बिटर जाणार

नासाचे ऑर्बिटर 17 सप्टेंबर रोजी विक्रमच्या लँडिंग साईटवरून जाणार आहे. नासाच्या या ऑर्बिटरने चंद्रावर मानवी पाऊल पडल्याच्या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने अपोलो 11 ज्या जागी उतरले होते, त्याचे फोटो पाठवले होते. नासाने पाठवलेले फोटो खूप स्पष्ट होते. त्यामुळे विक्रम लँडरचे फोटोही नासाच्या ऑर्बिटर मिळण्याची आशा आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top