Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
येमेनच्या किनाऱ्याजवळ लाल समुद्रात हल्ल्यानंतर हिंदुस्थानी मालवाहू जहाज बुडाले, 13 हिंदुस्थानींची सुटका

येमेनच्या किनाऱ्याजवळ लाल समुद्रात हल्ल्यानंतर हिंदुस्थानी मालवाहू जहाज बुडाले, 13 हिंदुस्थानींची सुटका

सामना 1 week ago

येमेनच्या किनाऱ्याजवळ लाल समुद्रात हिंदुस्थानी मालवाहू जहाजावर हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर जहाज उलटले आणि बुडाले. या जहाजामध्ये 13 हिंदुस्थानींसह 14 खलाशी होते. येमेनी कोस्ट गार्डने सर्वांची सुखरूप सुटका करत त्यांना मोखा बंदरावर आणले.

परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा निषेध केला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी यमेनच्या किनाऱ्याजवळ ‘एमएसव्ही फैझ नुरे ओलिया’ (MSV Faize Noore Oliya) जहाजावर हल्ला करण्यात आला. रियाधमधील हिंदुस्थानी दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी येमेनी अधिकाऱ्यांशी सक्रियपणे समन्वय साधत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. तसेच येमेनी अधिकाऱ्यांच्या सहकार्याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने त्यांचे आभार मानले आहेत.

याआधी जुलै महिन्यात, काळ्या समुद्रात व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका हिंदुस्थानी खलाशाचा मृत्यू झाला होता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana