Friday, 06 Sep, 7.34 am सामना

मुंबई
येणारं सरकार आपलंच, आणि मुख्यमंत्रीसुद्धा!

'महाराष्ट्रात येणारं सरकार आपलंच आणि पुढे…' असं म्हणत उद्धव ठाकरे क्षणभर थांबले आणि मग हसत म्हणाले, 'काय बोलायचंय ते तुम्हाला कळलं असेलच…' मुंबई सेंट्रल येथे एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका मांडताच त्यांचा रोख 'मुख्यमंत्रीसुद्धा आपलाच' असा आहे हे सगळय़ांच्याच लक्षात आले. प्रसिद्धीमाध्यमांनी या 'स्टेटमेंट'ला ठळक प्रसिद्धी दिली. राजकीय विरोधकांमध्ये त्यावरून चर्चा रंगली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या या विधानाकडे पाहिले जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top