Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
५ सप्टेंबरला पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत भव्य युवाशक्ती दहीहंडीचे आयोजन ! - धनंजय महाडिक, खासदार, भाजप

५ सप्टेंबरला पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत भव्य युवाशक्ती दहीहंडीचे आयोजन ! - धनंजय महाडिक, खासदार, भाजप

कोल्हापूर - दसरा चौकात ५ सप्टेंबरला धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजप यांच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच प्रयत्नात ५ थर लावून सलामी देणार्‍या गोविंदा पथकाला प्रोत्साहन म्हणून ५ सहस्र रुपये, ६ थर रचून सलामी देणार्‍या गोविंदा पथकाला १० सहस्र रुपये, तर ८ थर लावणार्‍या गोविंदा पथकाला १ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

दहीहंडी फोडणार्‍या पथकाला ३ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषेदत दिली.

१. 'भागीरथी महिला संस्थे'कडून सर्व गोविंदा पथकांसाठी खाद्यपदार्थ वितरीत केले जाणार आहेत. सर्वांत वरच्या थरावर चढून दहीहंडी फोडणार्‍या गोविंदाच्या सुरक्षेसाठी, प्रतीवर्षीप्रमाणे विशेष सुरक्षेचे उपाय केले जातील.

२. दहीहंडी फोडणारा सर्वांत वरच्या थरावरील गोविंदा १४ वर्षांवरील असावा, तर सर्व गोविंदांना १० लाख रुपयांपर्यंतचे अपघाती विमा कवच असणार आहे. युवाशक्ती दहीहंडीच्या निमित्ताने छायाचित्रण स्पर्धाही आयोजित केली आहे. सर्वोत्कृष्ट छायाचित्रांना अनुक्रमे ७, ५ आणि ३ सहस्र रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.

३. शासनाने दहीहंडी खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. त्यानुसार सर्व नियमांचे पालन करून स्पर्धेचे आयोजन होणार आहे. दहीहंडीचा आनंद आणि थरार अनुभवण्यासाठी कोल्हापूरवासियांनी ५ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता दसरा चौकात उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेला 'चॅनेल बी'चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, नगरसेवक वैभव कुंभार, प्रमोद पाटील, विनोद कम्बोज यांसह अन्य उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi