सोलापूर - सोलापूर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी ४ जूनपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत ठरवण्यात आली आहे. १८ जून या दिवशी मतदान होणार असून २२ जूनला मतमोजणी होईल.
निवडणूक प्रक्रियेसाठी १८ मेपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून तिची काटेकोर कार्यवाही केली जाईल. मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस्. कार्तिकेयन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, तर साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी कार्यरत रहातील.

