सोलापूर - जिल्ह्यातील विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सर्व सिद्धता पूर्ण झाली असून १८ जून या दिवशी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. कुर्डूवाडी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा आणि अकलूज या ६ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था केली आहे.
एकूण ६१६ मतदारांपैकी एका मतदाराचे निधन झाल्याने ६१५ मतदार मतदान करणार आहेत. या निवडणुकीची मतमोजणी २२ जून या दिवशी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सोलापूर येथे होणार असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २५ जूनपर्यंत पूर्ण होणार आहे.

