मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने आंतरराष्ट्रीय सोने तस्कर टोळीवर कारवाई केली. 'ऑपरेशन मिडनाईट गोल्डस्ट्राईक' या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
यात १० कोटी ७५ लाख रुपये किमतीचे ६.८५९ किलोग्रॅम सोने जप्त केले.
या टोळीचे जाळे दुबई, बँकॉक आणि मालदीव येथपर्यंत पसरलेले होते. हे बांगलादेशी प्रवासी या आंतरराष्ट्रीय शहरांमधून सोन्याची पावडर मेणाच्या कॅप्सूलमध्ये लपवून मुंबई विमानतळावर घेऊन येत. सामान्य सुरक्षा पडताळणीत हे लहान कॅप्सूल ओळखणे अत्यंत कठीण होते. मुंबई विमानतळावर पोचल्यानंतर आतील कर्मचारी प्रवाशांकडून सोने कह्यात घेऊन ते सुरक्षा यंत्रणांची दृष्टी चुकवून विमानतळाबाहेर काढण्यास साहाय्य करत होता.

