Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आता डिजिटल पेमेंट करतांना पूर्ण भ्रमणभाष क्रमांक दिसणार नाही !

आता डिजिटल पेमेंट करतांना पूर्ण भ्रमणभाष क्रमांक दिसणार नाही !

वी देहली - देशात 'डिजिटल पेमेंट' करणार्‍या कोट्यवधी 'यूपीआय' वापरकर्त्यांची गोपनीयता अधिक सशक्त करण्याच्या दृष्टीने 'एन्.पी.सी.आय.'ने (नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) मोठे पाऊल उचलले आहे.

'एन्.पी.सी.आय.'ने गूगल पे, फोनपे, पेटीएम् यांसह सर्व 'यूपीआय' ॲप्स आणि पार्टनर बँक यांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. नवीन नियमांनुसार आता 'यूपीआय' ('युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस' ही भ्रमणभाषद्वारे एका बँक खात्यातून दुसर्‍या बँक खात्यात झटपट पैसे पाठवण्याची व घेण्याची एक सुरक्षित डिजिटल प्रणाली) व्यवहाराच्या वेळी वापरकर्त्याचा पूर्ण भ्रमणभाष क्रमांक दुसर्‍या व्यक्तीला दिसणार नाही. हे निर्देश 'डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन' कायद्याच्या अंतर्गत देण्यात आले आहेत. 'यूपीआय' व्यवहाराच्या वेळी ग्राहकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे, हा यामागचा उद्देश आहे.

१. 'एन्.पी.सी.आय.'च्या नवीन निर्देशांनुसार 'यूपीआय' ॲप्स आणि बँक यांना ग्राहकांची वैयक्तिक माहिती प्रत्येक 'कस्टमर-फेसिंग इंटरफेस'वर ('स्क्रीन'वर) लपवावी लागेल. म्हणजेच व्यवहाराच्या वेळी समोरील व्यक्तीला पूर्ण भ्रमणभाष क्रमांक दिसणार नाही. त्याऐवजी केवळ भ्रमणभाष क्रमांकचे शेवटचे ४ अंकच दिसतील.

२. यासह 'क्यूआर कोड'द्वारे पैशांचा व्यवहार केल्यानंतरही ग्राहकाचा पूर्ण भ्रमणभाष क्रमांक स्क्रीनवर दिसणार नाही.

३. नवीन व्यवस्था लागू झाल्यानंतर भ्रमणभाष क्रमांक सार्वजनिक होण्याचा धोका अल्प होईल आणि डिजिटल पेमेंटच्या वेळी वैयक्तिक माहिती पूर्वीच्या तुलनेत अधिक सुरक्षित राहील.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi