Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आवश्यकता पडल्यास इराणशी युद्ध करण्यास अमेरिका पूर्णपणे सज्ज ! : US defense chief Pete Hegseth

आवश्यकता पडल्यास इराणशी युद्ध करण्यास अमेरिका पूर्णपणे सज्ज ! : US defense chief Pete Hegseth

सिंगापूर - इराणसमवेत कोणत्याही निष्कर्षाविना चर्चा चालू असली, तरी आवश्यक पडल्यास सैनिकी कारवाई करण्यास आम्ही सज्ज आहोत. आमच्याकडे उत्कृष्ट आणि मुबलक प्रमाणात दारुगोळ्याचा साठा आहे, असे विधान अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी येथे केले.

'इराणला अण्वस्त्र मिळू नयेत, ही अमेरिकेची भूमिका आहे', याचा हेगसेथ यांनी पुनरुच्चार केला.

हेगसेथ पुढे म्हणाले की, चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण आशियामध्ये स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी अमेरिका कटीबद्ध आहे. या प्रदेशावर कोणत्याही एका देशाचे वर्चस्व निर्माण होऊ देऊ नये, हा अमेरिकी धोरणाचा भाग आहे. याचबरोबर अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांनी भविष्यात सुरक्षेच्या दायित्वांमध्ये मोठा वाटा उचलावा, अशीही अमेरिकेची अपेक्षा आहे. अमेरिकेने श्रीमंत राष्ट्रांना अनुदान देण्याचे युग आता संपले आहे, असेही ते म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi