Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांची हॉकी स्टेडियम,  गांधीनगर आणि कसबा बावडा येथील कामांची पहाणी !

आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांची हॉकी स्टेडियम, गांधीनगर आणि कसबा बावडा येथील कामांची पहाणी !

कोल्हापूर - महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी २६ एप्रिल या दिवशी हॉकी स्टेडियम, गांधीनगर आणि कसबा बावडा येथील विविध कामांची प्रत्यक्ष पहाणी करून संबंधित अधिकार्‍यांना आवश्यक सूचना दिल्या.

प्रथम आयुक्तांनी 'मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम' येथील मैदानाची पहाणी करून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश शहर अभियंत्यांना दिले. परिसरातील स्वच्छता राखावी, तसेच झाडांच्या फांद्या छाटण्याच्या सूचनाही संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आल्या.

यानंतर त्यांनी गांधीनगरमधील महापालिकेच्या हद्दीतील चालू असलेल्या मिळकतींच्या सर्व्हेची जागेवर पहाणी करून माहिती घेतली. शेवटी आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी कसबा बावडा येथील ७६ एम्.एल्.डी. आणि ४ एम्.एल्.डी., तसेच अमृत-२ मधील १५ एम्.एल्.डी.च्या नवीन कामांची माहिती घेतली. जी कामे राहिलेली आहेत, ती तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले. या वेळी उपायुक्त परितोष कंकाळ, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, साहाय्यक अभियंता सुरेश पाटील यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi