सनातनने आतापर्यंत गुरुकृपायोगाच्या अंतर्गत विविध साधनामार्गांची ओळख करून देणारे ग्रंथ प्रकाशित केले आहेत, तसेच 'सनातन प्रभात'च्या माध्यमातूनही वाचकांना त्यांची ओळख करून दिली आहे.
आगामी काळात अध्यात्म आणि विविध साधनामार्ग यांची अधिक सविस्तर माहिती जिज्ञासूंना देता यावी, यासाठी त्यासंदर्भातील लिखाणाचे संकलन करणे चालू आहे. यासंदर्भात लेख असणारे दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक यांसारखी नियतकालिके, तसेच ग्रंथ कुणाकडे असल्यास त्यांनी ती पुढील पत्त्यावर पाठवावी.
१. ही नियतकालिके/ग्रंथ मुद्दामहून खरेदी करून पाठवू नयेत.
२. नियतकालिके/ग्रंथ पाठवण्यापूर्वी ती सनातनकडे उपलब्ध आहेत का ?, याची निश्चिती करण्यासाठी खाली उल्लेख केलेल्या ई-मेल पत्त्यावर नियतकालिकांची/ ग्रंथांची यादी पाठवावी. यादी पाठवतांना नियतकालिक/ग्रंथाचे नाव, प्रकाशनाची दिनांक, पाठवणार्याचे नाव आणि संपर्क क्रमांक यांचा उल्लेख करावा. संबंधित साधकांनी त्यासंदर्भात परत निरोप दिल्यावरच ती नियतकालिके/ग्रंथ गोवा येथील मुख्य कार्यालयात पाठवावीत.
३. ही नियतकालिके मुद्दामहून खर्च करून पोस्टाने पाठवू नये. आपल्या भागातून कुणी साधक गोवा येथे येत असल्यास त्यांच्या मार्फत किंवा सनातनच्या जवळील सेवाकेंद्रात जमा करावीत.
श्री. अमोल बधाले, [email protected]
'सनातन आश्रम', २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन - ४०३४०१

