Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Agra LoveJihad Girl Suicide : लव्ह जिहादी फैजानच्या धमक्यांना कंटाळून हिंदु मुलीची आत्महत्या !

Agra LoveJihad Girl Suicide : लव्ह जिहादी फैजानच्या धमक्यांना कंटाळून हिंदु मुलीची आत्महत्या !

गरा (उत्तरप्रदेश) - येथील शमसाबाद पोलीस ठाण्याच्या सीमेतून 'लव्ह जिहाद'ला बळी पडलेल्या एका हिंदु विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. फैजान नावाच्या मुसलमान तरुणाने 'राहुल' असे नाव सांगत तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले.

मैत्रीचा अपलाभ उठवून जिहाद्याने पीडितेची छायाचित्रे आणि व्हिडिओ सिद्ध केले. फैजानची खरी ओळख समोर आल्यावर त्याने पीडितेला आक्षेपार्ह छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन सतावणे चालू केले. जिहाद्याच्या त्रासाला कंटाळून पीडितेने स्वत:चे जीवन संपवले. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

१. पीडित मुलीची तिच्या एका मैत्रिणीच्या माध्यमातून फैजानशी भेट झाली होती. फैजानने स्वत:ची ओळख 'राहुल' अशी करून दिली. राहुल या दोन्ही विद्यार्थिनींना त्याच्या दुचाकीवरून परीक्षा केंद्रापर्यंत सोडायला जाऊ लागला.

२. या वेळी आरोपीने पीडित मुलीचा भ्रमणभाष क्रमांक मिळवला आणि त्यांच्यात संभाषण चालू झाले. हळूहळू आरोपीने पीडित मुलीला त्याच्या जाळ्यात अडकवले आणि तिची काही छायाचित्रे आणि व्हिडिओ मिळवले.

३. काही काळानंतर पीडित मुलीला समजले की, स्वतःला राहुल सांगणार्‍या तरुणाचे खरे नाव फैजान आहे आणि तो फिरोजाबादचा रहिवासी आहे. त्यानंतर पीडित मुलीने त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला; परंतु फैजानने तिच्यावर भेटण्यासाठी आणि बोलण्यासाठी दबाव आणण्यास चालू केले. नकार दिल्यास तो तिची छायाचित्रे आणि व्हिडिओ सामाजिक माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊ लागला.

४. हळूहळू मुलगी प्रचंड भीतीखाली जगू लागली. एक आठवड्यापूर्वी तिने घडलेला सर्व प्रकार तिच्या कुटुंबाला सांगितला. वडिलांनी तिला धीर दिला आणि कायदेशीर कारवाईचे आश्‍वासन दिले; परंतु ती तीव्र मानसिक तणावाखाली होती.

५. २ ऑगस्ट या दिवशी घाबरलेल्या मुलीने घरातील कीटकनाशक प्राशन केले. कुटुंबियांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचाराच्या वेळी ३ ऑगस्टला सकाळी तिचा मृत्यू झाला.

६. मृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे. पोलिसांचे एक पथक फिरोजाबादमध्ये आरोपीचा शोध घेत असून त्याला लवकरच अटक केली जाईल, असे पोलीस उपायुक्त अभिषेक अग्रवाल यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi