पुणे - शिरूर तालुक्यातील चांडोह येथील िजल्हा परिषद शाळेला अज्ञात व्यक्तीने कुलूप लावले. त्यामुळे शाळेत आलेल्या ९१ विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांऐवजी भर उन्हात रस्त्यावर बसून शिक्षण घ्यावे लागले.
या प्रकारामुळे शिक्षक आणि पालक यांनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली. (विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्या संबंधिताचा तातडीने शोध घेऊन त्याला कारागृहात डांबायला हवे ! - संपादक). 'अज्ञातावर गुन्हा नोंद करून शिक्षा द्यायला हवी', अशी मागणी पालकांनी केली.

