Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अज्ञातांनी बजरंग दलाच्या पदाधिकार्‍यांवर पिस्तूल रोखून धमकी दिली

अज्ञातांनी बजरंग दलाच्या पदाधिकार्‍यांवर पिस्तूल रोखून धमकी दिली

कोल्हापूर - हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून व्हिडिओ सिद्ध करून ते प्रसारित करण्याच्या प्रकरणी २ धर्मांधांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात बजरंग दलाचे विभाग संयोजक नीलेश शिंदे यांना अज्ञाताने एकांतात गाठून डोक्यावर बंदूक रोखून धमकी दिल्याचा आरोप हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी केला आहे.

या प्रकरणी शिरोली औद्योगिक वसाहतीतील पोलीस ठाण्यावर हिंदुत्वनिष्ठांनी मोर्चा काढून पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित धर्मांध शाहरूख देसाई आणि शाहीद सनदे यांच्या कुटुंबियांना दिलेला पोलीस बंदोबस्त काढून घ्या आणि तो बंदोबस्त नीलेश शिंदे यांना द्या, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली आहे. या प्रकरणी उपस्थित वरिष्ठांनी योग्य ते कार्यवाहीचे आश्वासन दिले. (ज्यांनी अत्याचार केला, त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण कशासाठी ? हा पोलीस प्रशासनाचा अजब न्याय नव्हे का ? - संपादक)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi