पुणे - अजित डोवाल हे केवळ एक सनदी अधिकारी नसून ते जन्मजात देशभक्त आणि खर्या अर्थाने 'धुरंधर' आहेत. वर्ष २०१४ नंतर भारताची परराष्ट्र नीती ही लाचार राहिली नसून ती 'कणा असलेली नीती' बनली आहे आणि याचे संपूर्ण श्रेय अजित डोवाल यांच्या कणखर नेतृत्वाचे आहे.
त्यांनी देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेला एक नवीन आणि आक्रमक दिशा दिली, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केले.
अजीत डोभाल जी को मिला लोकमान्य तिलक पुरस्कार इस देश के लिए जीने वाले लोगों के लिए बहुत बड़ी प्रेरणा बनेगा। pic.twitter.com/2U2Fqf5raa
- Amit Shah (@AmitShah)
हिंदुत्वाचे आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचे प्रखर पुरस्कर्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त दिला जाणारा मानाचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' यंदा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री. अजित डोवाल यांना १ ऑगस्ट या दिवशी गुलटेकडी येथील महाराष्ट्र मंडळाच्या मैदानात पार पडलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. या वेळी शहा बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, उदय सामंत, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, पुण्याचे महापौर आणि मोठ्या संख्येने राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.
"Ajit Doval gave an aggressive direction to the nation's internal and external security!"
- Amit Shah, Union Home Minister
National Security Advisor Ajit Doval was honored with the prestigious 'Lokmanya Tilak National Award'! 🏆✨
PC: @TheDailyJagranpic.twitter.com/gYnpBqAeMI
- Sanatan Prabhat (@SanatanPrabhat)
पुरस्काराला उत्तर देतांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री. अजित डोवाल भावूक झाले. पुण्याच्या स्मृतींना उजाळा देत ते म्हणाले, ''पुणे ही केवळ विचारवंतांची नाही, तर पराक्रमी वीरांची भूमी आहे. माझे शालेय शिक्षण याच शहरात झाले आणि जवळपास ७६ वर्षांनंतर याच पवित्र भूमीत हा सन्मान मिळणे, हे माझे परमभाग्य आहे.
यदि आज लोकमान्य तिलक जी होते, तो शायद हमें एक नया युद्ध घोष, या नया नारा देते कि "भारत को सशक्त और विकसित बनाना मेरा जन्मसिद्ध कर्तव्य है और मैं इसे करके ही रहूँगा" - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री. अजित डोवाल जी #Maharashtra#LokmanyaTilakNationalAwardpic.twitter.com/i3YT6jQbD5
- भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra)
लोकमान्यांनी 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे', असा मंत्र दिला होता, आजच्या काळात देशाला शक्तिशाली आणि विकसित बनवणे हे आपले 'जन्मसिद्ध कर्तव्य आहे.' राष्ट्रहिताच्या आड येणारी कोणतीही गोष्ट कितीही लाभदायी असली, तरी तिचा त्याग करणे, हेच खरे राष्ट्रकर्तव्य आहे. तरुण पिढीने राष्ट्रभक्तीचा हा अंगार मनात सतत धगधगता ठेवावा.''
पुणेरी पगडी, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि लोकमान्य टिळक यांनी लिहिलेल्या 'गीतारहस्य' या अजरामर ग्रंथाची इंग्रजी प्रत, असे श्री. डोवाल यांना देण्यात आलेल्या पुरस्काराचे स्वरूप होते. श्री. डोवाल यांनी 'इंटेलिजन्स ब्युरो'चे प्रमुख होण्यापूर्वी ३ दशकांहून अधिक काळ भारताच्या गुप्तचर यंत्रणेत सेवा बजावली. सध्या ८१ वर्षांचे असलेले ते भारताचे सर्वाधिक काळ सेवा बजावलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.
अमित शहा पुढे म्हणाले की,
लोकमान्य टिळकांनी विचारांच्या ताकदीने वसाहतवादी जुलूमाविरुद्ध लढा दिला, तर अजित डोवाल यांनी बुद्धीमत्ता, रणनीती आणि अढळ निश्चयाने आतंकवाद अन् राष्ट्रीय सुरक्षेपुढील आव्हानांचा सामना केला आहे. आपण सगळे घरात शांतपणे झोपू शकतो, कारण आपल्याला ठाऊक नसलेली शेकडो आक्रमणे श्री. अजित डोवाल आणि त्यांच्या गटाने उधळून लावली आहेत. श्री. अजित डोवाल यांच्यासारख्या मोजक्याच व्यक्तींनी या शांत युद्धाला पूर्णपणे आत्मसात् केले आहे. अजित डोवाल हे 'कीर्ती चक्र' पुरस्काराने सन्मानित होणारे भारतातील पहिले पोलीस अधिकारी आहेत. हा सन्मान प्रामुख्याने सैन्यदलातील सैनिकांना दिला जातो.
'लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट'चे अध्यक्ष रोहित टिळक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या वेळी ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणती टिळक यांच्यासह इतर ६ विश्वस्त उपस्थित होते. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. उपस्थितांच्या प्रचंड देशभक्तीपर घोषणा आणि 'वंदे मातरम्'च्या जयघोषात या कार्यक्रमाची सांगता झाली.
अमित शहा यांच्या पुणे दौर्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आंदोलन करत तीव्र विरोध केला; मात्र तो पूर्णपणे झुगारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे येथे आले.
श्री. अजित डोवाल यांनी भारताचे सुरक्षा सिद्धांत पूर्णपणे पालटले आहेत. आता भारत हा मार खाणारा किंवा शांत बसणारा देश राहिला नसून शत्रूच्या घरात घुसून मारणारा 'नवा भारत' झाला आहे.
Celebrating Service to the Nation📸
A memorable moment with Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah, DCM Eknath Shinde ji, DCM Sunetratai Pawar, MoS Madhuritai Misal, President of the Lokmanya Tilak Smarak Trust Dr. Rohit Tilak and other dignitaries as we… pic.twitter.com/VB0BRutHEi
- Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)
🔸Union Home and Cooperation Minister Amit Shah presents the 'Lokmanya Tilak National Award 2026' to NSA Ajit Doval in the presence of CM Devendra Fadnavis.
DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Union MoS Murlidhar Mohol, Minister Chandrakant Patil, Minister Uday Samant, MoS… pic.twitter.com/zlEOAsfFUC
- CMO Maharashtra (@CMOMaharashtra)
अजित डोवाल यांनी आतंकवादाचे कंबरडे मोडले असून भारताची गुप्तचर यंत्रणा जगात अव्वल स्थानावर पोचवली आहे.
हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण देशाच्या सुरक्षाव्यवस्थेचा आणि प्रखर राष्ट्रभक्तीचा बहुमान आहे.

हा मानाचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' प्रखर राष्ट्रभक्तीचा गौरव करणे, असामान्य धैर्य आणि धाडसाचे अभिनंदन करणे, दूरदृष्टी अन् कर्तव्याप्रती निष्ठा जोपासणे आणि राष्ट्र उभारणीतील अतुलनीय योगदानाचा सन्मान करणे या ४ मुख्य उद्देशांना अनुसरून प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार भारताच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यातील श्री. अजित डोवाल यांच्या ऐतिहासिक सेवेचा बहुमान करतो, ज्यामध्ये आतंकवादविरोधी आक्रमक कारवाया, अत्यंत संवेदनशील गुप्त मोहिमा, कणखर सीमा सुरक्षा आणि सामरिक नेतृत्वातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा समावेश आहे. त्यांच्या प्रदीर्घ आणि दैदिप्यमान कारकीर्दीत 'ऑपरेशन ब्लॅक थंडर', 'डोकलाम वाटाघाटी' आणि 'बालाकोट सर्जिकल एअर स्ट्राईक' यांसारख्या राष्ट्राच्या सुरक्षेशी जोडलेल्या ऐतिहासिक आणि यशस्वी कामगिरीचा प्रामुख्याने समावेश आहे.

