Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'अखिल भारत हिंदु महासभे'च्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जयंती सोहळा उत्साहात पार पडला

'अखिल भारत हिंदु महासभे'च्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जयंती सोहळा उत्साहात पार पडला

कोल्हापूर - ज्यांनी आपल्या प्रखर राष्ट्रभक्तीने, लेखणीने आणि क्रांतीकारी विचारांनी संपूर्ण ब्रिटीश साम्राज्याला हादरवून सोडले, अशा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जयंती सोहळा 'अखिल भारत हिंदु महासभे'च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र अभ्यासक श्री. आनंद कुलकर्णी यांचे व्याख्यान झाले, तसेच श्री. सुरेश कदम यांनी 'शब्दात क्रांती-स्वरात राष्ट्रभक्ती' हा वीर सावरकर यांच्यावरील गीतांचा कार्यक्रम सादर केला.

इचलकरंजी येथील 'नवदुर्गा भजनी मंडळा'चे बजरंग ओतारी आणि मंगलताई लायकर यांनी भजनांचा कार्यक्रम सादर केला. या प्रसंगी महामंडलेश्वर पंचायत निरंजन आखाडा अध्यक्ष मेहंदीपुर बालाजी राजस्थानचे सियाराम गिरि महाराज, श्री महालक्ष्मीदेवी मंदिराचे व्यवस्थापक श्री. महादेव दिंडे, माजी सैनिक श्री. विजय हारूगले, पन्हाळा येथील डॉ. राज होळकर, इचलकरंजी येथील ज्येष्ठ उद्योजक श्री. दत्ता राणे, हिंदु महासभेच्या महिला आघाडीप्रमुख शीलाताई माने, श्री. संजय कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. नंदकुमार घोरपडे, श्री. मनोहर सोरप, जिल्हाप्रमुख श्री. राजेंद्र तोरस्कर, जिल्हा उपाध्यक्ष श्री. विकास जाधव, श्री. प्रशांत पाटील, श्री. शेखर वीरकर, वैद्या अश्विनी माळकर, पूनमताई सुळगांवकर, 'हिंदु एकता आंदोलना'चे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, 'मराठा तितुका मेळवावा'चे श्री. योगेश केरकर, 'महाराजा प्रतिष्ठान'चे श्री. निरंजन शिंदे, यांसह हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi