('अल्लाहू अकबर' म्हणजे अल्ला महान आहे)
मुंबई - 'ईद-ए-मिलाद'निमित्त मुसलमानांनी मुंबईमध्ये ठिकठिकाणी काढलेल्या मिरवणुकांमध्ये अक्षरश: हैदोस घातला. हिंदूंबहुल भागांमध्ये हिरवे झेंडे फडकवणे, 'अल्ला-हू-अकबर'च्या घोषणा देणे, मोठ्या आवाजात 'डॉल्बी' (उच्च गुणवत्तेची ध्वनीयंत्रणा) लावणे अशा प्रकारे मुसलमानांनी हुल्लडबाजी केली.
परळ-लालबाग मार्गावर हिंदूबहुल भागांतही 'हिरवे झेंडे फडकवून घोषणा देत हिंदूंना डिवचणार्या धर्मांध मुसलमानांना हिंदूंनी चोप देऊन या भागातून अक्षरश: हाकलून दिले.
🚨 Incident during an Eid procession in Parel, Mumbai!
Hindus united and drove away religious fanatics who were creating a ruckus while chanting "Allahu Akbar" late in the night.
O Hindus, let this unity be seen every time.pic.twitter.com/sUGDMPVvR7
- Sanatan Prabhat (Kannada) (@Sanatan_Prabhat)
१. २६ ऑगस्टच्या रात्री ९.३० पासून परळ-लालबाग मार्गावर मुसलमान युवकांनी 'अल्ला-हू-अकबर'च्या घोषणा देत दुचाकीवरून एकावेळी तिघा जणांनी बसून 'स्टंटबाजी' केली.
२. मुसलमान युवकांच्या या हुल्लडबाजीमुळे लोकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले होते. हुल्लडबाजी करणार्या मुसलमान युवकांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली.
३. रात्री १२ वाजेपर्यंत हा प्रकार चालू होता. पोलिसांनी समजावूनही मुसलमान युवकांनी त्यांचे न ऐकता अधिकच हुल्लडबाजी करून हिंदूंना उकसवण्याचा प्रयत्न करत होते.
४. हा प्रकार समजताच लालबाग-परळ येथून मोठ्या प्रमाणात हिंदू येथील लक्ष्मी कॉटेज येथे जमा झाले आणि त्यांनी 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या. या वेळी मुसलमानांनी हिंदूंवर दगड आणि बाटल्या फेकल्या. त्यामुळे संतप्त हिंदूंनी मुसलमान युवकांना चोप दिला आणि त्यांना पिटाळून लावले.
५. या प्रकारानंतर लालबाग-परळ भागात, तसेच शहरात अन्यत्रही मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

