कोल्हापूर, २१ ऑगस्ट (वार्ता.) - हिंदु लिंगायत आणि वीरशैव लिंगायत समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे या संस्थेच्या लक्षित गटामध्ये हिंदु लिंगायत आणि वीरशैव लिंगायत समाजाचा समावेश करणारा शासन आदेश इतर मागास बहुजन कल्याण विभागाने प्रसिद्ध केला आहे.
या आदेशानुसार समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास नागरिक आणि विद्यार्थ्यांना 'अमृत' संस्थेच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती समस्त लिंगायत समाज राज्याध्यक्ष संजय तेलनाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी पत्रकार परिषदेस मनोज कुमार रणदिवे, राजशेखर तंबाके, शंकर बिराजदार, रमेश मिठारे, विनोद कागले यांसह अन्य उपस्थित होते.

