Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अपहरण रोखण्यासाठी आलेल्या हिंदु व्यक्तीची निर्घृण हत्या !

अपहरण रोखण्यासाठी आलेल्या हिंदु व्यक्तीची निर्घृण हत्या !

रायचुरू (कर्नाटक) - येथील असलम नावाच्या मुसलमान तरुणाने एका १४ वर्षांच्या अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण केले. हे अपहरण रोखण्यासाठी पुढे सरसावलेल्या ईशप्पा (वय ३० वर्षे) नावाच्या हिंदु व्यक्तीची मुसलमानांनी निर्घृण हत्या केली.

🚨 Brutal Murder of Hindu Man While Trying to Prevent Kidnapping

Raichur, Karnataka: A minor Hindu girl was kidnapped by Mechanic Hussain and his friend. A Hindu man who tried to stop the abduction was brutally murdered.

Since there is a "Pakistani regime" under Congress in… pic.twitter.com/8RB0k06X54

- Sanatan Prabhat (@SanatanPrabhat)

१. घटनेच्या रात्री ईशप्पा आपल्या घराच्या छतावर झोपले होते. या वेळी मुसलमान तरुण असलम आणि त्याचे मित्र एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेत असल्याचे ईशप्पा यांच्या लक्षात आले.

२. पीडित मुलगी ईशप्पा यांचे मित्र आंजनेय यांच्या भावाची मुलगी होती. त्यामुळे ईशप्पा यांनी लगेच छतावरून खाली येऊन त्या तरुणांना अडवले आणि 'मुलीला कुठे घेऊन जात आहात?' असा प्रश्न विचारला.

३. या वेळी संतापलेल्या असलम आणि त्याच्या टोळीने वायरने ईशप्पाचा गळा आवळून हत्या केली. हे कृत्य केल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले.

४. मुसलमान तरुणांनी अपहरण केलेल्या मुलीच्या घरासमोरच ईशप्पा यांचा मृतदेह ठेवला आहे. दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी पीडितांच्या कुटुंबियांनी लावून धरली आहे.

५. या प्रकरणी यापलदिन्नी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi