मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणारा अप्पर वैतरणा तलाव पूर्णपणे आटला आहे. त्याचा पाणीसाठा शून्यावर आला आहे. त्यामुळे त्यातून मुंबईला होणारा पाणीपुरवठा प्रशासनाला संपूर्णपणे बंद करावा लागला आहे.
वर्ष २०२५ मध्ये १ जूनपर्यंत या तलावात ७ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी होते; पण यंदा वाढत्या उन्हामुळे पाणीसाठ्यावर परिणाम झाला.
मुंबईला पाणीपुरवठा करणार्या सर्व ७ तलावांची सरासरी टक्केवारी पाहिल्यास त्यात केवळ १५.५७ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा केवळ ४० ते ४५ दिवसच पुरू शकतो.

