फ्लॉरिडा (अमेरिका) - अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने चंद्र मोहिमेसाठी अंतराळ यान 'आटेर्मिस-२' प्रक्षेपित केले. येथील केनेडी स्पेस सेंटरमधून झेपावलेल्या या यानामध्ये ४ अंतराळविरांना पाठवण्यात आले आहे.
५० वर्षांपूर्वीच्या 'अपोलो' मोहिमेनंतर नासाकडून पहिल्यांदाच चंद्र मोहीम आखण्यात आली आहे. 'आर्टेमिस-२' अभियानाद्वारे ४ अंतराळवीर चंद्राभोवती एक प्रदक्षिणा घालतील आणि अनुमाने १० दिवसांनी पृथ्वीवर परततील.
अमेरिकेचे अंतराळवीर रीड वाईजमन, व्हिक्टर ग्लोव्हर आणि क्रिस्टीना कोच, तसेच कॅनडाचे जेरेमी हॅन्सेन हे चंद्राची प्रदक्षिणा घालतील. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जवळपास एक वर्ष घालवलेल्या ४७ वर्षीय कोच या चंद्राच्या परिसरात पोचणार्या पहिल्याच महिला अंतराळवीर ठरणार आहेत. अंतराळविरांना चंद्राजवळ पोचण्यासाठी ३-४ दिवसांचा कालावधी लागणार आहे.

