Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Attack On Salman Rushdie : आरोपी हादी मतार याला आतंकवादाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये ठरवले दोषी !

Attack On Salman Rushdie : आरोपी हादी मतार याला आतंकवादाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये ठरवले दोषी !

न्यूयॉर्क (अमेरिका) - 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या कादंबरीचे लेखक सलमान रश्दी यांच्यावर वर्ष २०२२ मध्ये न्यूयॉर्क येथे झालेल्या प्राणघातक आक्रमण प्रकरणात अमेरिकेच्या फेडरल (संघीय) न्यायालयाने हादी मतार (वय २८ वर्षे) याला आतंकवादाशी संबंधित गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले.

फेडरल न्यायालय ३ नोव्हेंबरला हादी मतारच्या शिक्षेवर अंतिम निर्णय देईल. आतंकवादाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये दोषी आढळल्यामुळे त्याला जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. यापूर्वी न्यूयॉर्कच्या राज्य न्यायालयाने आरोपी हादी मतार याला सलमान रश्दी यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी दोषी ठरवले होते. राज्य न्यायालयाने त्याला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.

JUSTICE SERVED 🇺🇸

A US federal jury has convicted Hadi Matar on federal terrorism charges for the 2022 knife attack on renowned author Salman Rushdie.

Already serving a 25-year sentence for attempted murder, Matar now faces life imprisonment after being found guilty of… https://t.co/gSKzMTF5q6pic.twitter.com/8IBz8LHojx

- Sanatan Prabhat (@SanatanPrabhat)

सलमान रश्दी यांना 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या त्यांच्या कादंबरीमुळे धर्मांधांकडून तीव्र विरोध आणि निषेध सहन करावा लागला. यामुळे इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांनी त्यांच्या मृत्यूविषयीचा फतवा (धार्मिक आदेश) काढला होता. यामुळे रश्दी यांना अनेक वर्षे सुरक्षेत लपून जीवन जगावे लागले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi