Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Baghpat Illegal Masjid : बडौत (उत्तरप्रदेश) शहरात मशिदीचे अवैध बांधकाम पाडण्याची हिंदूंची मागणी

Baghpat Illegal Masjid : बडौत (उत्तरप्रदेश) शहरात मशिदीचे अवैध बांधकाम पाडण्याची हिंदूंची मागणी

बागपत (उत्तरप्रदेश) - बडौत शहरातील कमलानगर भागात एका मशिदीचे अवैध बांधकाम केल्याचा आरोप करत हिंदूंनी २७ ऑगस्ट या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. त्यांनी हे मशिदीचे बांधकाम पाडण्याची मागणी केली.

निदर्शकांनी सांगितले की, त्यांनी यापूर्वीही यावर आक्षेप नोंदवला होता; परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. (उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार असतांना तक्रार करूनही कारवाई होत नाही, हे आश्चर्यजनकच म्हणावे लागेल ! - संपादक)

विकास प्राधिकरणाकडून या मशिदीवर नोटीस लावून संस्थाचालकांना इमारतीचा संमत नकाशा आणि संबंधित कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले होते; परंतु मशीद संस्थाचालकांकडून निर्धारित वेळेत कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्यानंतर हिंदूंनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोचून निदर्शने केली.

कमलानगरमधील मशिदीची इमारत नियमांविरुद्ध आणि संमतीविना बांधण्यात आल्याचा आरोप निदर्शकांनी केला. प्रशासकीय अधिकार्‍यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन दिले आहे. चौकशीनंतर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi