Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बांधकामासाठी महाराष्ट्रातील युवक इस्रायलला जाणार !

बांधकामासाठी महाराष्ट्रातील युवक इस्रायलला जाणार !

मुंबई - महाराष्ट्रातील युवकांना इस्रायलमध्ये कामाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील १०३ बांधकाम कामगार इस्रायलला जात आहेत. त्यातील पहिली ६० जणांची तुकडी २ सप्टेंबर या दिवशी इस्रायलला जाण्यासाठी निघाली.

इस्रायलमध्ये या युवकांना दरमहा २ लाख रुपये वेतन, वैद्यकीय सुविधा, तसेच शासकीय स्तरावरील सुरक्षेची शाश्वती देण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये 'महाराष्ट्राची कौशल्यशक्ती आता जगभर' या कार्यक्रमाचे आयोजन राज्यशासनाकडून करण्यात आले होते. यामध्ये इस्रायला बांधकामासाठी जाणार्‍या युवकांची निवड करण्यात आली.

याविषयी कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, ''इस्रायलमध्ये कामासाठी जाणार्‍या युवकांनी कठोर परिश्रम करून कुटुंबासह महाराष्ट्राचा आणि देशाचा नावलौकिक वाढवावा. भारतीय संस्कृतीचा आदर राखत शिस्त, प्रामाणिकपणा आणि व्यावसायिकता जपावी.''

महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ आणि 'एन्एस्डीसी इंटरनॅशनल' यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. इस्त्रायलमध्ये जाणार्‍या या कामगारांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभाच्या अंतर्गत येत्या २९ सप्टेंबर या दिवशी राज्यभरातील १ सहस्र ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi