नवी देहली - भारतीय जनसंघाचे तत्कालीन अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले आहे. याआधी हिंसाचार आणि भय यांच्या वातावरणात बंगालमध्ये निवडणुका व्हायच्या. या वेळी प्रथमच निवडणुका शांततेत मतदान झाले आणि एकाही निर्दोष नागरिकाची हत्या झाली नाही.
हा लोकशाहीचा विजय आहे.
Speaking from the @BJP4India HQ in Delhi. https://t.co/Eu15QXV34v
- Narendra Modi (@narendramodi)
बांगलादेशी घुसखोरांना सोडणार नाही. बंगालच्या महिलांना आता सुरक्षा पुरवली जाईल. आजपासून बंगालच्या नवीन यात्रेला आरंभ करूया, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील भाजप मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करतांना केले. बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
"No Mercy for Infiltrators!" - PM's Strong Message After #BengalVictory
Following BJP's historic win in Bengal, the Prime Minister addressed party workers with a firm stance against Bangladeshi infiltrators.
He stated that the long-cherished vision of Shyama Prasad Mookerjee… pic.twitter.com/XElAfJALtA
- Sanatan Prabhat (@SanatanPrabhat)
पंतप्रधान पुढे म्हणाले की,
काँग्रेस चुकीच्या दिशेने चालली आहे. ज्या साम्यवाद्यांच्या विचारधारेमुळे त्यांचा आता देशभरातून राजकीय अंत झाला आहे, तीच विचारधारा घेऊन काँग्रेस पुढे जात आहे. काँग्रेस शहरी नक्षलवाद्यांचा टोळी बनत चालली आहे. तिचाही अंत लवकरच होईल.

