Dailyhunt
बंगल्याच्या आवारात गांजाची शेती करणार्‍याला अटक

बंगल्याच्या आवारात गांजाची शेती करणार्‍याला अटक

पुणे - पठारे वस्ती, लोहगाव येथे हर्ष पांचाल या तरुणाने भाड्याने बंगला घेतला होता. या बंगल्याच्या परिसरात संशयास्पद हालचाली चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बंगल्यावर धाड टाकली असता बंगल्याच्या बागेत लहान-मोठी अशी एकूण ४१ गांजाची झाडे आढळून आली.

(गांजाची शेती करण्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत; मात्र कठोर कारवाई न झाल्यामुळे हे गुन्हे थांबत नाहीत. पोलीस हे लक्षात घेतील का ? - संपादक) आरोपीकडील वाहनातूनही गांजा आणि गांजाची विक्री करण्यासाठी वापरण्यात येणारे ९ भ्रमणभाषसंच असा ६ लाख रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेण्यात आला. या प्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi