ढाका (बांगलादेश) - बांगलादेशात सातत्याने होणारी विद्यार्थी आंदोलने आणि हिंसाचार यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने 'जमात-ए-इस्लामी' आणि तिची विद्यार्थी संघटना 'इस्लामी छात्र शिबिर' यांना आतंकवादी संघटना घोषित केले आहे.
सरकारने १ ऑगस्ट २०२६ या दिवशी यासंदर्भात अधिसूचना प्रसारित केली आहे.
🚨 Bangladesh declares 'Jamaat-e-Islami' and its student wing 'Islami Chhatra Shibir' as terrorist organisations!
The groups were accused of involvement in violent protests aimed at overthrowing former PM Sheikh Hasina's government.
⚠️ India too must remain vigilant against… pic.twitter.com/ThTfXLKFU3
- Sanatan Prabhat (@SanatanPrabhat)
नुकत्याच झालेल्या निदर्शनांत परिस्थिती इतकी बिघडली की, २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर सहस्रो जण घायाळ झाले. हिंसेचे गांभीर्य लक्षात घेऊन बांगलादेश उच्च न्यायालयाने १६ जुलै ते २१ जुलै २०२६ या काळात घडलेल्या घटनांच्या अन्वेषणासाठी ३ न्यायाधिशांचा एक आयोग स्थापन केला आहे.
'अधिकार' या मानवाधिकार संघटनेच्या अहवालानुसार एप्रिल ते जून २०२६ या काळात जमावाकडून मारहाण आणि राजकीय चकमक यांमध्ये ७४ जणांचा मृत्यू झाला. यांपैकी ३३ जणांचा बळी जमावाच्या आक्रमणात, तर ४१ जणांचा मृत्यू राजकीय हिंसाचारात झाला. या काळात सुमारे ९७० जण घायाळही झाले. जमावाने मारलेल्या बहुतांश लोकांवर चोरी किंवा दरोडा यांचा संशय होता. काही जणांची हत्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून किंवा गावांमधील अनधिकृत पंचायतींमध्ये करण्यात आली.
'बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी'(बी.एन्.पी.)मधील गटबाजीमुळे या कालावधीत पक्षांतर्गत ५७ संघर्ष झाले, ज्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आणि ४०० जण घायाळ झाले. बी.एन्.पी.मधील वाद वसुली, भागांवर नियंत्रण मिळवणे, निवडणुकीची तिकिटे, पक्ष परिषद आणि राजकीय वर्चस्व यावरून होते. अनेक घटनांमध्ये बंदुका, बाँब आणि इतर प्राणघातक शस्त्रे यांचाही वापर करण्यात आला.

