Dailyhunt
भगवान परशुराम यांचा अवमान करणार्‍या सेबी वाज याला कह्यात घेण्याची मागणी

भगवान परशुराम यांचा अवमान करणार्‍या सेबी वाज याला कह्यात घेण्याची मागणी

वास्को, ४ मे (वार्ता.) - फेसबुकच्या माध्यमातून भगवान परशुराम यांचा अवमान करणारा सेबी वाज याला कह्यात घेण्याची मागणी मुरगाव तालुक्यातील अनेक हिंदूंनी ४ मे या दिवशी वास्को पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन केली.

या प्रकरणी वास्को पोलीस ठाण्यात ३ मे या दिवशी तक्रार नोंदवण्यात आली आहे.

हिंदूंनी सेबी वाज याला त्वरित कह्यात घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे. सेबी वाज याच्या नातेवाइकांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. संशयित सेबी वाज सध्या पसार आहे. यामुळे सेबी वाज याच्या विरोधात 'लूक आऊट' नोटीस (आरोपी देश सोडून जाऊ नये, यासाठी काढण्यात येणारी नोटीस) काढावी, अशी मागणी हिंदूंनी केली आहे.

सामाजिक कार्यकर्ते गोविंद शिरोडकर यांचे म्हापसा पोलिसांनी केले अन्वेषण

चिंबल येथील सामाजिक कार्यकर्ते तथा अधिवक्ता गोविंद शिरोडकर यांनी सामाजिक माध्यमातून प्रसारित झालेल्या एका भाषणातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. 'जुने गोवे येथील फ्रान्सिस झेविअर' आणि गोमंतकीय यांचा 'डी.एन्.ए.' एकच आहे', असे वादग्रस्त विधान अधिवक्ता गोविंद शिरोडकर यांनी केले होते. या प्रकरणी म्हापसा येथील सूजन नाईक यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. म्हापसा पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते गोविंद शिरोडकर यांचे अन्वेषण केले आहे.

वॉरन आलेमाव यांचे सलग दुसर्‍या दिवशी पणजी पोलिसांकडून अन्वेषण

''सनातन धर्माबद्दल माझ्या मनामध्ये नितांत आदर आहे. माझे अनेक मित्र हिंदु आहेत. गोव्यात हिंदु, ख्रिस्ती आणि अन्य धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र रहात आहेत अन् यामुळे आपण कधीही सनातन धर्माच्या विरोधात बोललो नाही. माझे वक्तव्य आणि व्हिडिओ यांचा विपर्यास करण्यात आला आहे'', असा खुलासा वॉरन आलेमाव यांनी ४ मे या दिवशी केला आहे. वॉरन आलेमाव यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सनातन धर्माचा अवमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वॉरन आलेमाव यांच्या विरोधात पणजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पणजी पोलिसांनी ४ मे या दिवशी सलग दुसर्‍यांदा वॉरन आलेमाव यांचे अन्वेषण केले. अन्वेषणानंतर पत्रकारांशी बोलतांना वॉरन आलेमाव यांनी हा खुलासा केला आहे.

वॉरन आलेमाव पुढे म्हणाले, ''मी कायदा पाळणारा आणि गोव्याचे हित जपणारा आहे. यामुळे पोलिसांना पाहिजे तेव्हा मी उपस्थित राहून अन्वेषणाला सहकार्य करणार आहे. मी प्रख्यात हिंदुत्वनिष्ठ लेखक, पत्रकार आणि यू ट्यूबर गौतम खट्टर यांना गोव्यात येण्यापासून बंदी घालण्याची मागणी केली होती; मात्र या विधानाचा चुकीचा अर्थ लावून वाद निर्माण करण्यात आला. ज्या संघटनेने वास्को येथे कार्यक्रमाचे आयोजन करून तेथे गौतम खट्टर यांना निमंत्रण दिले, त्या संघटनेचेही अन्वेषण होणे आवश्यक आहे.''

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi