Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारतावर वाईट परिणाम करणारी खोटी कथानके !

भारतावर वाईट परिणाम करणारी खोटी कथानके !

मागील लोकसभा निवडणुकीत खोट्या कथानकांचा हिंदु मतदारांवर फार मोठा प्रभाव पडला. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. सध्या 'काँग्रेसमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले', असे खोटे कथानक पसरवले जाते; पण देशाच्या फाळणीसाठी काँग्रेस पक्षही उत्तरदायी आहे, हे सांगितले जात नाही.

मुस्लीम लीगसह सहभागी होऊन भारत-बांगलादेश सीमेवर अनुमाने १० लाख हिंदूंचा नरसंहार झाला आणि २ कोटी हिंदूंना विस्थापित व्हावे लागले. यासाठी काँग्रेस उत्तरदायी होती; पण ते कुणीही सांगत नाही. त्यामुळे काँग्रेस स्वातंत्र्य मिळवून देणारा पक्ष नाही, तर फाळणी आणि त्यानंतर हिंदूंची शोकांतिका घडवून आणणारा पक्ष आहे, अशी त्यांची ओळख प्रस्थापित केली पाहिजे. स्वातंत्र्याचा उल्लेख होतो, तेव्हा राजगुरु, भगतसिंह आाणि सुखदेव या ३ नावांव्यतिरिक्त क्रांतीकारकांचा उल्लेख केला जात नाही. वास्तविक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापासून चंद्रशेखर आझादपर्यंत अनेक क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यात मोठी भूमिका बजावली आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटीश राजवटीच्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकला. त्यामुळे जेव्हा दूरचित्रवाणी किंवा इतर माध्यमांमध्ये चर्चा होईल, तेव्हा 'काँग्रेस पक्ष देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा नाही, तर फाळणी घडवून आणणारा पक्ष आहे', असे ठामपणे सांगितले पाहिजे आणि सर्व खोट्या कथानकांना खतपाणी घालणे थांबवले पाहिजे.

जेव्हा मुसलमानांचा उल्लेख होईल, तेव्हा त्यांना अल्पसंख्यांक नाही, तर 'दुसरा सर्वांत मोठा बहुसंख्य गट' असे म्हणायला प्रारंभ केला पाहिजे. या देशात त्यांची लोकसंख्या पाकिस्तानच्या लोकसंख्येहून अधिक आहे. अल्पसंख्यांकांच्या नावावर ते विविध लाभ मिळवत आहेत. ते स्वतःला अल्पसंख्यांक म्हणतात आणि बहुसंख्यांक हिदूंवर वर्चस्व गाजवतात.

भारतात पारशी हे खरे अल्पसंख्यांक आहेत. त्यांची देशात केवळ ६० सहस्र एवढी लोकसंख्या आहे. ते औद्योगिकीकरणाच्या क्षेत्रात लक्षावधी लोकांना रोजगार देत आहेत आणि देशाच्या प्रगतीत मोठा वाटा उचलत आहेत. भारताच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात मुसलमानांना अवाजवी महत्त्व दिली जात आहे. जोपर्यंत हे थांबत नाही, तोपर्यंत आपण प्रगती करू शकत नाही. धर्मांध नेहमी म्हणत असतात, 'वर्ष २०४७ पर्यंत भारत एक इस्लामी देश बनेल.' ते केवळ म्हणत नाही, तर त्यादृष्टीने ते रणनीतीही आखत आहेत. याविरोधात एकही राजकीय पक्ष बोलतांना दिसत नाही.

सरकारला खाली खेचण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर जी काही आंदोलने झाली, ती योग्य प्रकारे हाताळली गेली नाहीत. अयोध्येचे श्रीराममंदिर बांधण्यासाठी सरकार केवळ एक माध्यम होते. या मंदिरासाठी केवळ हिंदु जनतेने पैसे दिले, कट्टरतावादी समाजाने नाही. त्यामुळे ते श्रीराममंदिर पाडण्याच्या धमक्या देऊ शकतात. जे प्रभु श्रीरामांचा द्वेष करतात, त्यांचे श्रीरामचंद्र रक्षण करत नाहीत. जे लोक विनाकारण सनातन धर्माचा द्वेष करतात आणि जे सनातन धर्माच्या तत्त्वांच्या विरोधात आहेत, अशा लोकांना प्रभु रामचंद्र शिक्षा देत आहेत. ते केवळ एक उत्तम पति, पुत्र इत्यादी नव्हता, तर एक क्षत्रिय योद्धाही होता. राजाला नकारात्मक शक्तींचा सामना करावा लागतो, अन्यथा चांगल्या शक्ती टिकू शकत नाहीत.

- डॉ. एस्.आर. लीला, प्रसिद्ध लेखिका, बेंगळुरू.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi