भिवंडी - येथील 'मेसर्स रेक्स इंटरनॅशनल' या आस्थापनावर धाड घालून मिथेनॉलचा ५ सहस्र ९२९ किलो साठा जप्त करण्यात आला. प्राथमिक अन्वेषणात पुणे प्रकरणातील दारूमध्ये वापरण्यात आलेले 'मिथेनॉल' याच आस्थापनाकडून पुरवण्यात आले होते.
'जनतेच्या आरोग्याशी खेळ करणार्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कायदेशीर आणि न्यायालयीन कारवाई करण्यात येईल. सुरक्षित अन्न आणि औषधे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून तो सुनिश्चित करणे, हेच आमचे सर्वोच्च दायित्व आहे', असे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.
या प्रकरणी आस्थापनाचे मालक अरुणकुमार चौबे आणि अभिषेक अरुणकुमार चौबे यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

