गया (बिहार) - बिहारमधील गया येथे रेहान अन्सारी नावाच्या मुसलमान तरुणाने हिंदु मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवून त्यांना फसवल्याचे आणि त्यानंतर त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचे समोर आले आहे.
रेहानने २० हिंदु तरुणींना अडकवण्याचे लक्ष्य ठेवले होते. पोलिसांच्या अन्वेषणात आतापर्यंत ६ मुलींचे व्हिडिओ समोर आले आहेत. एका अल्पवयीन हिंदु मुलीच्या कुटुंबाने रेहानविरुद्ध तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात 'पॉक्सो' कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.
रेहानच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) झाल्यानंतर तो पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.रेहानच्या एका मोठ्या भावानेही त्याच भागातील हिंदु मुलीला फसवून तिच्याशी लग्न केले होते.

