बीरभूम (बंगाल) - जिल्ह्यातील मिनार मंडल या माजी बसचालकाच्या घरावर पोलिसांनी धाड टाकून २८ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम आणि १५ किलो सोन्याची नाणी अन् बिस्किटे जप्त केली. या संपूर्ण जप्त मालमत्तेचे बाजारमूल्य ५० कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
₹28 crore in cash and 15 kg of gold seized from the residence of a former State Transport (ST) bus driver in Birbhum, Bengal!
The accused, Muhammad Minar Mondal, amassed this wealth after leaving his government job and becoming involved in an illegal sand and stone mining… pic.twitter.com/Ie34Mwdmv7
- Sanatan Prabhat (@SanatanPrabhat)
१. सर्व रोख रक्कम ३५ लोखंडी ट्रक आणि गोण्या यांमध्ये भरण्यात आली होती. नोटा मोजण्यासाठी आणलेली ५ यंत्रे सतत चालल्यामुळे बंद पडली. तब्बल १५ घंट्यांच्या अथक प्रयत्नांनंतर ही सर्व रोकड मोजली गेली. पोलिसांनी मिनार मंडल याला अटक केली आहे.
२. मिनार हा पूर्वी राज्य परिवहन महामंडळात बसचालक म्हणून कार्यरत होता.
तो बीरभूममधील वाळू आणि दगड खाणीच्या अवैध व्यावसायाचा मुख्य सूत्रधार तुलू मंडल याचा मेहुणा आहे. सरकारी नोकरी सोडल्यानंतर मिनार तुलू मंडलच्या अवैध व्यवसायात सहभागी झाला. टोल नाक्यांवरून जाणार्या ट्रक्सकडून वसुली करण्याचे दायित्व मिनारकडे होते.
३. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत जप्त केलेली ही सर्व संपत्ती तुलू मंडल याच्या अवैध व्यावसायातून गोळा केल्याचे मिनारने मान्य केले आहे.

