नाशिक - मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई पदाच्या भरती परीक्षेच्या वेळी एका परीक्षा केंद्रावर एका परीक्षार्थीने त्याच्या बुटामध्ये भ्रमणभाष लपवला असल्याचे उघड झाले. प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर भ्रमणभाषच्या माध्यमातून गुगलवर प्रश्नांची उत्तरे तो शोधत होता.
हे पर्यवेक्षकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तक्रार केली. या प्रकरणी मनोज वाघ (वय ३० वर्षे) याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

