मुंबई - महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटप निश्चित झाले. एकूण १७ जागांपैकी भाजप ११ जागांवर, शिवसेना ४ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर निवडणूक लढवणार आहेत.
या वाटाघाटीत शिवसेना ७ जागांसाठी आग्रही असली, तरी शेवटी ४ जागांवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी काँग्रेसने एक अतिरिक्त जागा मिळवण्यात यश मिळवले. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ भाजपकडे गेला आहे. लवकरच राज्यातील विविध मतदारसंघांमध्ये प्रलंबित असलेल्या विधान परिषद निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे.

