Dailyhunt
छत्रपती संभाजीनगर येथे ८ दिवसांपासून पाठलाग करणार्‍या धर्मांधाला धाडसी प्राध्यापिकेने रस्त्यातच खडसावले !

छत्रपती संभाजीनगर येथे ८ दिवसांपासून पाठलाग करणार्‍या धर्मांधाला धाडसी प्राध्यापिकेने रस्त्यातच खडसावले !

त्रपती संभाजीनगर - शहरातील सिडको परिसरातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेत व्याख्यात्या म्हणून कार्यरत असलेल्या हिंदु महिलेचा सलग ८ दिवस पाठलाग करणार्‍या एका धर्मांध तरुणाला पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

पीडित महिलेने स्वतः रणरागिणीचे रूप धारण करत या धर्मांधाला भररस्त्यात थांबून खडसावले. तैबान कलीम खान असे या धर्मांध आरोपीचे नाव आहे.

गेल्या ८ दिवसांपासून आरोपी तैबान हा दुचाकीवरून पीडित महिलेच्या मागावर होता. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर २ मेच्या सकाळी ९.२५ वाजता पीडितेने त्याला अडवून खडसावले असता त्याने महिलेशी अरेरावी करत भररस्त्यात वाद घातला. वाद चालू असतांनाच पीडितेच्या ओळखीच्या एका तरुणाने प्रसंगावधान राखून आरोपीला पकडले आणि थेट पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात आरोपी तैबान कलीम खान याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सिडकोतील शैक्षणिक संस्थांच्या परिसरात टवाळखोर आणि धर्मांध यांचा वावर वाढला आहे. अशा ठिकाणी केवळ गुन्हा नोंदवून न थांबता पोलिसांनी 'दामिनी पथका'ची गस्त वाढवावी आणि अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुजाण नागरिकांकडून होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi